डोंबिवली निवासी भागात तीन माकडांचा उच्छाद

डोंबिवली दि.०४ – डोंबिवली निवासी भागात गेले दोन तीन दिवस तीन माकडांचा उच्छाद होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. या भागातील शिवसेनेचे कार्यकर्ते राजू नलावडे यांनी वनाधिकारी कल्याण यांना पत्र पाठवून या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे .निवासी भागात बंगले भागात मोठ्या प्रमाणात मोठे वृक्ष असून त्या झाडावर माकडे फिरत असतात. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे . मध्यंतरी डोंबिवली शहरात दोन दिवस माकड फिरत होते. त्याने काही महिलांवर हल्ला पण केला होता. आता पुनः अचानक तीन माकडे निवासी भागात धुमाकूळ घालत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत

Leave a Reply

Your email address will not be published.