डोंबिवली निवासी भागात डेंग्यू झालेले चार ते पाच रुग्ण आढळले
डोंबिवली दि.२७ – डोंबिवलीत सध्या ताप ,सर्दी खोकल्याची साथ असताना निवासी भागात चार ते पाच डेंग्यू सदृश्य रुग्ण आढळले असल्याचे समजते मात्र त्या रुगणाची नावे देण्यास नातेवाईकांनी नकार दिला नाव जाहीर केले तर पालिकेचे कर्मचारी त्रास देतील अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. डोंबिवली औद्योगिक भागातील निवासी भागातील १८ वर्षांची तरुणी ४ दिवसासपूर्वी ठाणे येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल होती कालच तिला डॉकटर नि घरी पाठवले आहे. ती तरुणी चार बिल्डिंग मध्ये रहात आहे.
हेही वाचा :- सेल्फी काढण्याच्या नादात पती-पत्नी आणि त्यांचा १२ वर्षांचा मुलगा नदीत वाहून गेल्याचे घटना पूर्णा नदीच्या पुलावर घडली
तर आणखी तीन ते चार रुग्ण तलाव रोड मिलाप नगर येथील असून रस्त्यातील खड्ड्यात पाणी साठल्याने व तलावातील पाणी खराब झाल्याने डेंग्यूच्या आळ्या त्यात तयार झाल्या अशी तक्रार रहिवासी करत आहेत सर्व रुग्ण घरीच उपचार घेत आहेत शिवसेनेचे या भागातील कार्यकर्ते राजू नलावडे यांनी वरील माहितीला दुजोरा दिला व आरोग्य विभाग तलावाची सफाई योग्य प्रकारे करत नाही असा आरोप त्यांनी केला कोणी अधिकारी आल्यास त्यांना आपण माहिती देण्यास तयार आहे असेही ते म्हणाले.