डोंबिवली ; दिवाळी फराळाचे पहिले पार्सल २५ तारखेला दूरदेशी निघाले…

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.२५ – दिवाळी सण काही दिवसांवर आला असताना आपल्या परदेशी असलेल्या नातेवाईकांना वेळेवर फराळ मिळावा वा या उददेशाने पालकांची धडपड असते.येत्या २५ तारखेला पहिले पार्सल गुरुवारी दूरदेशी रवाना होत आहे.आपल्या सुनेला,मुलाला व इतर नातेवाईकांना ऐन दिवाळीत फराळ खायला मिळावा म्हणून पालकांची धडपड सुरु असते.

महागाईने नागरिक त्रस्त असताना वर्षातला महत्वाचासण सर्व आपल्या परीने साजरा करत असतात. डोंबिवलीतील मुले- मुली मोठ्या प्रमाणावर शिक्षणासाठी परदेशी आहेत शिवाय अनेक जण तिकडेच स्थायिक झाले आहेत.त्याना ऐन दिवालित फराळ मिळावा म्हणून सध्या सुरस फुडस व कुलकर्णी ब्रदर्स येथे पालकांची झुंबड उडाली आहे.

डोंबिवलीतून साधारण १७६ देशांमध्ये फराळ पाठवला जातो. प्रमुख्याने अमेरिका, इंग्लंड, दुबई, कॅनडा, न्यूझीलंड, मलेशिया, सिंगापूर आदि देशात दिवाळीचा फराळ पाठवला जातो. असे सुरुस फुडसचे सुनील शेवडे यांनी सांगीतले.आपल्याकडे जरी तयार फराळाचे व इतर वस्तूंचे दर गगनाला भिडले असले तरी परदेशी फराळ नेणार्या कुरियर कंपन्यांनी मात्र दरवाढ केलेली नाही.

यामुळे गेल्यावर्षाचेच दर असल्याचे श्रीपाद कुलकर्णी यांनी सांगितले. तयार दिवाळी फराळासोबतच आकाश कंदिल, पणत्या,कॅलेंडर,रांगोळी, सुवासिक साबण, घरगुती उटणे आदि वस्तूही पाठवल्या जातात.महागाई गगनाला भिडली असली तरी दूरदेशात पार्सल पाठवण्यावर फारसा परिणाम झाला नाही.याशिवाय भांडी,कपडे य वस्तूही पाठवण्यात येतात.३ ,५ व ७ किलो असे गट केले असून त्यानुसार पार्सलचे दर आकारले जात असल्याचे शेवडे व कुलकणी यांनी सांगीतले.

Leave a Reply

Your email address will not be published.