डोंबिवली काँग्रेस नेत्यावर पाणी चोरीचा गुन्हा दाखल
डोंबिवली – न्यू आयरे रोड येथील राज डेव्हलपर्सचे विकासक व डोंबिवली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विकास उर्फ राजाभाऊ पाटकर यांनी म्हात्रे नगर येथे साई राज पार्क हि नवीन इमारत बांधली आहे.मात्र कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे सदर नवीन बिल्डींगला दोन वर्षांपासून पाणी चोरी करून वापर केला जात होता.या प्रकरणी महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे अनिरुद्ध सराफ यांनी तपास करून हि पाणी चोरी उघडकीस आणली .अखेर त्यांच्या फिर्यादीवरून विकासक पाटकर यांच्या विरोधात 1 लाख 56 हजार रुपयांची पाणी चोरी केली म्हणून डोंबिवली पोलीस ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.
Please follow and like us: