डोंबिवली कल्याण मध्ये सुट्ट्यांच्या मोसमात चोरट्यांचा धुमाकूळ

चार घरफोडीच्या घटना मध्ये तब्बल 4 लाख 49 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास 

(श्रीराम कांदु)
कल्याण : कल्याण डोंबिवली शहरासह आसपासच्या परिसरात चोरट्यानी एकच धुमाकूळ घातला आहे .शाळांना सुट्ट्या असल्याने नागरिक घराला कुलूप लावून बाहेर गावी गेल्याने चोरट्यांचे चांगलेच फावले असून बंद घरे फोडण्याचा सपाटा लावला आहे.काल दिवसभरात कल्याण डोंबिवली मधील विविध पोलीस स्थानकात चार घरफोडीच्या घटनांची नोंद झाली असून या चार घरफोड्या मध्ये चोरट्यानी रोकड व दागिने असा मिळून एकूण तब्बल 4 लाख 49 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे . डोंबिवली पुर्वेकडील राजू नगर चिदानंद नगर येथील स्वानंद बंगल्यात राहणारे डॉ सचिन चावक हे 25 तारखेला घराला कुलूप लावून बाहेर बाहेरगावी गेले होते .अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या हॉलच्या खिडकीचे ग्रील वाकवून घरात प्रवेश करत घरातील रोकड व सोन्याचे दागिने असा मिळून एकूण 2 लाख 30 हजारांचा मुद्देमाल लंपास केला .सोमवारी सकाळी घरी परतल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले त्यांनी या प्रकरणी विष्णू नगर पोलीस स्थानकात तक्रार केली असून या तक्रारी नुसार पोलिसानी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे .
दुसरी घटना कल्याण पूर्वेत घडली आहे .कल्याण पुर्वेकडील पूना लिंक रोड येथील महेश कॉलनी येथील चाळीत राहणारे शंकर शिंदे रवीवारी सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून मुंबई येथे गेले होते .घराला कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यान सोन्याचे दागिने व रोकड असा मिळून 97 हजरांचा मुद्देमाल लंपास केला .काल सकाळी घरि परतल्या नंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले त्यांनी या प्रकरणी कोळशेवाडी पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसानी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे .तीसरी घटना कल्याण पूर्वेत घडली आहे .कल्याण पूर्वेकडील काटेमानवली हनुमान नगर अश्विनी अपार्टमेंट मध्ये राहणा-या अनुसया गायकवाड 63 काल दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून मार्केट मध्ये गेल्या होत्या .घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यानी भरदुपारी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत घरातील सोन्या चांदीचे दागिने मिळून एकूण 46 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल लॅम्पस केला सायंकाळी चार च्या सुमारास घरी परतल्यानंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले त्यानि या प्रकरणी कोळशेवाडी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसानी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे .
चौथी घटना डोंबिवली पूर्वेत घडली आहे .डोंबिवली पुर्वेकडील नांदीवली रोड अजंठा सोसायटी पराग बंगल्यात राहणारे पराग चौधरी गत शुक्रवारी घराला कुलूप लावून कुटुंबासह बाहेर गावी गेले होते .घराला कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यानी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात घुसून घरातील सोन्या चांदीचे दागिने व रोकड मिळून एकूण 76 हजारांचा मुद्देमाल लंपास केला .काल सकाळी घरी परतल्या नंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले त्यांनी या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानाकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसानी अद्न्यत चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याच शोध सुरू केला आहे .लागोपाठ घडणाऱ्या या घटना मुळे नागरिक दहशतीच्या वातावरणात असून या चोरट्यानी पोलीस यंत्रणेला ही चक्रावून सोडल्याचे दिसून येत आहे.
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email