डोंबिवली  कल्याणसह ठाणे जिल्ह्यातील कलेक्टर लॅन्डमधीलअडचणी दूर होनार

  • डोंबिवली  कल्याणसह ठाणे जिल्ह्यातील कलेक्टर लॅन्डमधीलअडचणी दूर होनार आणि मराठी तरुणांना उद्योगास प्रोत्साहन मिळावं म्हणून आवश्यक असलेलं स्टार्ट-अप धोरण तातडीने आणावं या विषयांसाठी राजसाहेबांनी मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

नुकत्याच झालेल्या राजसाहेबांच्या कल्याण-डोंबिवलीच्या दौऱ्यात तिथल्या नागरिकांनी जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या अखत्यारीत असलेल्या जमिनींवरच्या जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न मांडला होता. या जमिनी अंदाजे ५०० विविध गृहनिर्माण संस्थांना १९६५ च्या आसपास भाडेपट्ट्याने देण्यात आल्या होत्या. जिर्णावस्थेत असलेल्या या इमारतींचा पुनर्विकासासाठी आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र मिळावे व या जमिनी गृहनिर्माण संस्थेच्या नावावर व्हाव्यात यासाठी नागरिकांचे १९८५ पासुन प्रयत्न सुरु होते.परंतु प्रश्न प्रलंबितच राहिला. आता या जमिनी त्या इमारतींच्या नावावर करण्यासाठी ‘नजराणा’ म्हणून २०१७ च्या प्रचलित रेडी रेकनर दरानुसार नजराणा शुल्क मागितलं जात आहे व जे काही कोटींच्या घरात जात आहे.
१९६५ ला जमिनींवर इमारती उभारलेल्या असताना आणि गेली ३० वर्षं पाठपुरावा सुरु असताना २०१७ च्या दरानुसार ‘नजराणा शुल्क’ आकारणऺ चुकीचं आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी तातडीने लक्ष घालून याविषयी निश्चित धोरण ठरवावं अशी मागणी केली गेली तसंच ‘नजराणा शुल्क’ आकारण्यासाठी ‘वर्ष निश्चिती’ करावी अशी मागणी केली गेली.

याच्याच जोडीला अजून एक मुख्य प्रश्न आहे तो म्हणजे राज्याला स्वतःच ‘स्टार्ट-अप धोरण’ नाही. आसपासच्या राज्यांनी आधीच ‘स्टार्ट-अप धोरण’ आणलं आणि ते योग्य पद्धतीने राबवल्यामुळे राज्यातील अनेक होतकरू तरुण-तरुणी हे नवउद्योग स्थापन करण्यासाठी शेजारील राज्यांत जात आहेत. मराठी तरुण-तरुणींनी उद्योगस्नेही व्हावं यांसाठी पोषक असं स्टार्ट-अप धोरण लवकरात लवकर यावं यांसाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इतर राज्यातील धोरणाप्रमाणेच राज्यातल्या स्टार्ट-अप्स (नवद्योगात) मध्ये ५०% नोकऱ्या स्थानिक मुला-मुलींनाच मिळायला हव्यात अशी धोरणात तरतूद असायला हवी अशी खास सूचना राजसाहेबांनी केली.

यावेळी राज्यातील सरकारला ३ वर्षं पूर्ण झाली म्हणून राजसाहेबांनी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केलं तर श्री. अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं.

यावेळी पक्षाचे नेते श्री.बाळा नांदगावकर ,श्री. शिरीष सावंत, सरचिटणीस श्री. राजू पाटील, उपाध्यक्ष श्री. राजेश कदम, डोंबिवली शहर अध्यक्ष श्री. मनोज घरत, मा.नगरसेवक श्री. राजन मराठे, नागरिक प्रतिनिधी म्हणून श्री. अनंत ओक, श्री. आशिष वैद्य, श्री. कुणाल गडहिरे, सौ. चित्रा पराडकर, श्री. घनश्याम जोशी, श्री. गिरीश नाचणे, श्री. अनंत कर्वे, श्री. दिलीपकुमार उतेकर, श्री. संतोष बिडवे आणि सौ. श्रद्धा पाटील उपस्थित होते.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email