डोंबिवली औद्योागिक विभाग अपघात विरहित बनवण्याचे ध्येय
”अपघात विरहित डोंबिवली औद्योगिक विभाग ”
(श्रीराम कांदु)
डोंबिवली – २६ मे २०१६मध्ये डोंबिवली औद्योगिक विभागातील प्रोबस कंपनीत महाभयनाक स्फोट झाल्याने डोंबिवली परिसर हादरुन गेला होता.याला दोन वर्षे पूर्ण होत असून या स्फोटामुळे उद्योजक खडबडून जागे झाले असून ‘कामा ‘ या उद्योजकांच्या संघटनेने औद्योगिक सुरक्षा,कामगार सुरक्षा,व डोंबिवलीकरांची सुरक्षा यावर लक्ष केंद्रित केले आहे.”अपघात विरहित डोंबिवली औद्योगिक विभाग ” बनवण्याचे ध्येय निश्चित केले आहे.यासाठी नवीन योजना अंमलात आणली जाणार असून ज्यात रसायन मिक्सिंग व त्याचा उत्कलन बिंदू ‘हे सेट करण्यात येणार आहे.यामुळेरसायन निर्मिती करताना कोणतेही अपघात घडणार नाही असे उपकरण सामाईक तत्वावर बसवण्यात येणार आहे.
डोंबिवली औद्योगिक विभागात १४५ रासायनिक कपंन्या,८० कापड प्रिक्रीया उद्योग आणि १२५ इंजिनियरींग असे सुमारे ३५० उद्योग कार्यरत आहेत.नव्या उपकरणासंदर्भात माहिती देताना ‘कामा ‘संघटनेचे कार्यवाह देवेन सोनी व माजी अध्यक्ष श्रीकांत जोशी म्हणाले,प्रोबस कपंनीत स्फोट झाल्यनतंर ‘डीश ”मार्ग”,सी इ टी पी व कामा यांनी एकत्र येऊन चर्चा केली.तसेच गेली दोन वर्षे उद्योजक कामगार यांचे प्रिशक्षण घेण्यात आले.त्यातून अपघात विरहित डोंबिवली औद्योगिक विभाग बनवण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले.यासाठी नवीन योजना अंमलात आणली जाणार असून ज्यात रसायन मिक्सींग व त्याचा उत्कलन बिंदू हे सेट करण्यात येणार आहे.सामाईक तत्वावर हे उपकरण बसवण्यात येणार असून या उपक्रमासाठी सुमारे ६ ते ७ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून सर्वाच्या सहभागाने व सुरक्षेशी निगडीत असल्याचे सर्वांना त्याचा फायदा होणार आहे असेही त्यानी सांगीतले.
तर श्रीकांत जोशी म्हणाले,उद्योजक आपली जबाबदार पार पाडत असताना उद्योजकांचीही शासनाकडून अपेक्षा असून औद्याोगिक विभागातील रस्यांची दयनीय अवस्था असून कचरा उचलला जात नाही,दिवाबत्ती नाही,सुसज्ज रुग्णालय नाही याकडे तातडीने प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.प्रोबस कंपनीत झालेल्या स्फेाटाने मालमत्तांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेच शिवाय १२ जणांचे प्रण गेले आहेत.तर शेकडो नागरिक जखमी झाले आहेत.यामुमुळे उद्योजक खडबडून जागे झाले असून येत्या वर्षभरात नवीन योजना अंमलात आणण्याचे उदिदष्ट ठेवण्यात आले आहे.
Please follow and like us: