डोंबिवली औद्योगिक भागात कारखान्यात पाणी शिरले

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.०९ – रविवारी रात्री पासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे डोंबिवली जलमय झाली शहराबरोबर औद्योगिक निवासी व कारखाण्यात पाणी शिरले असून कामगारही कामावर येऊ शकले नाहीत ‘ कामा ‘या उद्योजकांच्या संघटनेचे अध्यक्ष देवेंन सोनी यांनी सांगितले की नाले सफाई योग्य न झाल्याने कारखान्यातून पाणी घुसले व वीज पुरवठा खंडित झाला हा भाग जलमय झाल्याने कामगारही कामावर येऊ शकले नसल्याने सर्व काम थंडावले आहे निवासी भागही जलमय झाला असून परिसराला जलाशयाचे स्वरूप आले आहे 

तर शहरात स्टेशन परिसर ,नांदीवली मठ भाग , कोपर ,भाजी मार्केट ,अभिनव स्कुल ,मिळापनगर ,एम्स हॉस्पिटल आदी भाग यंदा प्रथमच जलमय झाला असल्याचे येथील शिवसेनेचे कार्यकर्ते राजू नलावडे यांनी सांगितले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email