डोंबिवली औद्योगिक निवासी भागात महानगर गॅसची गळती
डोंबिवली दि.२६ – डोंबिवली औद्योगिक निवासी भागात सुमारे ६० टक्के नागरिकांकडे महानगर घरगुती गॅस कनक्श्न असून अंदाजे २२५ सोसायट्यांमध्ये गॅस पुरवठा सुरु आहे. पण सोमवारी रात्री अकरा नंतर विकोनाका परिसरात गॅसची गळती झाल्याने कंपनीने कनेक्शन बंद केले यामुळे सुमारे २२५ सोसायटयामध्ये सकाळचा चहा उकळला नाही. त्यामुळे नागरिकांची खूपच पंचायत झाली.
डोंबिवली निवासी भागातील रहिवाशांनी काल रात्री अकराच्या सुमारास गॅस वास येत असल्याची तक्रार केल्यानंतर महानगर कंपनीची इमरज्यन्सी व्हॅन व कर्मचारी निवासी भागात आले व त्यानी गळती कुठे लागली याचा तपास सुरु केला अखेर त्याना कल्याण शिळ रोडजवळ विको नाका परिसरात जमिनीखाली गळती सुरु असल्याचे लक्षात आले म्हणून कर्मचार्यानी मिलापनगर येथील मुख्य व्हॉल पॉईंट बंद केला व पाईपलाईनमधील गॅस बाहेर काढण्याचे काम सुरु केलं यामुळे घरोघरी होणारा घरगुती गॅस बंद करण्यात आली आज सकाळी त्यामुळे नागरिकांना सकाळी कामावर जाण्यासाठी चहा न करताच जावे लागले शिवाय आंघोळीसाठी पाणीही गरम मिळाले नाही घरुन निघताना जेवणाचा डबापण नेता आला नाही यासंदर्भात शिवसेनेचे या भागाचे कार्यकर्ते राजू नलावडे यांनी सांगितले की सकाळपासूनच नागरिकांच्या तक्रारी आल्या असून घरोघरी महानगर गॅस असल्याने दुसरी पर्यायी सेाय नाही, रॉकेल केल नाही,, गॅस सिलींडर नाही यामुळे नागरिकांची खूपच पंचायत झाली असेही ते म्हणाले. गॅस पुरवठा करणारी एक लाईन बंद झाली तर पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी त्यानी केली यामुळे आज नागरिकांना जो त्रास झाला तो झाला नसता असे ते म्हणाले.
एम आय डी सी निवासी भागात महानगर गॅस पुरवठा काल रात्री पासून बंद असल्याने नागरिकांना खाद्यपदार्थ बनविता आले नाही व गॅस सिलींडर परत केल्याने वा मिळाले तरी त्याचा उपयोग गॅस शेगडीमध्ये वापरमा आले नसल्याने शेकडो नागरिकांची कोंडी झाली व सकाळी चहा न पिता डबा घेण्यासाठी भाजीपोळी केंदारावर धाव घ्यावी लागली.यासंदर्भात महानगर गॅस कपंनीचे व्यवस्थापक मिलींद रानडे यांना विचारले असता ते म्हणाले आमचे गस्ती पथक फिरत होते त्याना गॅस गळतीचा वास आला व त्यानी शोध घेऊन जेथे गळती आले तेथे काम सुरु केले व यासाठी घरोघरी होणारा पुरवठा बंद करावा लागला.