डोंबिवली आर्ट सोसायटीतर्फे ५ ऑगस्टला “गुरू वंदना “
डोंबिवली दि.०४ – डोंबिवली आर्ट सोसायटीतर्फे रविवार ५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत नवा उपक्रम आयोजित करण्यात आला असून डोंबिवलीतील १२ कलाकार १२ गुरूंना “मानवंदना “देणार आहेत.
या संदर्भात माहिती देताना आर्ट सोसायटीचे प्रभू कापसे म्हणाले गुरू पौर्णिमा नुकतीच। साजरी झाली पण आर्ट सोसायटीचे विद्यार्थी विविध क्षेत्रातील १२ गुरूंचे चित्र काढून मानवंदना देणार आहेत. प्रत्येक कलाकाराला 2 तास देण्यात आले असून आनंद बाल भवन येथे हा अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.
Please follow and like us: