डोंबिवलीला उपायुक्तांची गरज नाही – पालिका आयुक्त गोविंद बोडके

(श्रीराम कांदु )

डोंबिवली दि.२६ – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त गोविंद बोडके यांनी सोमवारी दुपारी अचानक डोंबिवलीतील पालिकेच्या विभागीय कार्यालयाची पाहणी केली. या कार्यालयाला उपायुक्तांची गरज नसल्याचे यावेळी आयुक्त बोडके यांनी सांगितले. तसेच सुरक्षा रक्षक आणि आप्तकालीन कक्षातील कर्मचाऱ्यांना ही झापले.

पालिका आयुक्त बोडके कार्यालयात आल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी पूर्ण गणवेश परीधान केले नसल्याने पाहून चांगलेच खडसावले. खाजगी वाहनांची कार्यालयाच्या आवारात पार्किंग पाहून आयुक्त संतापले होते. त्यानंतर आप्तकालीन कक्षाची पाहणी केली असता त्या ठिकाणीची साफसफाई झाली नसल्याने कर्मचाऱ्यांच्या कामावर नाराजी व्यक्त केली.पाहणी झाल्यानंतर पत्रकारांनी या कार्यालयात पूर्ण वेळ उपायुक्त बसत नसल्याची वास्तविकता मांडली असता आयुक्तांनी या कार्यलयात उपायुक्तांची गरज नाही. येथील प्रभाग क्षेत्र अधिकारयांनी काम पाहिले पाहिजे असे गोविंद बोडके यांनी सांगितले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email