डोंबिवलीत ६ लाख ८० हजारांची घरफोडी

डोंबिवली – डोंबिवली पूर्वेकडील नांदिवली रोड परीसारतील एका इमारती मध्ये चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करत घरातील रोख रक्कम व दागिने असा मिळून एकूण ६ लाख ८० हजारांचा मुद्देमाल लंपास केला या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली आहे .

डोंबिवली पूर्वेकडील नांदिवली रोड परिसरात गुरु कृपा दर्शन इमारती मध्ये राहणारी मनाली चव्हाण हि काल सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून कॉलेज मध्ये प्रवेश घेण्यासाठी गेली होती  .घराला कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून घरातील रोख रक्कम व दागिने असा मिळून एकूण ६ लाख ८० हजारांचा मुद्देमाल लंपास केला .सायंकाळी घरी परतल्या नंतर तिला घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले तिने या प्रकरणी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे .

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email