डोंबिवलीत ११० बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.२७ – डोंबिवलीच्या पूर्वेकडील फडके रोड, इंदिरा गांधी चौक, चिपळूणकर रोड, केळकर रोड, आदी रेल्वे स्थानक परिसरात नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणे, नो एंट्रीत घुसणे, बॅज नसणे, गणवेश नसणे आदी मध्ये 62 रिक्षाचालक, ४२ दुचाकीस्वार, ३ कार चालक, ३ टेम्पोचालक अशा सुमारे ११० बेशिस्त वाहनचालकांवर डोंबिवली वाहतूक नियंत्रण विभागाच्या पोलिस अधिका-यांनी बुधवारी कारवाई करत त्यांच्याकडून 20 हजार रूपयांचा दंड वसुल केला आहे.

वाहन चालवतांना लायसन नसणे, उद्धट वर्तन, राँग साईडने वाहन चालवणे असे प्रकार वाढीस लागले आहेत. त्यामुळे शहरातील वाहतूक नियंत्रण सपशेल कोलडमते. या सवयी मोडण्यासाठी काटेकोर कारवाई करणे आवश्यक आहे. विशेषत: स्थानक परिसरात अशा बेशिस्त वाहनचालकांमुळे शहराचे नियोजन सपशेल कोलमडते. त्यासाठी फडके रोड, बाजीप्रभु चौक, इंदिरा गांधी चौक, पाटकर रोड, चिपळूणकर रोड, चार रस्ता आदी भागामध्ये कारवाई करण्यात आली. यापैकी बहुतांशी वाहनांना दंड भरल्यानंतर सोडण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email