डोंबिवलीत स्फोटकाच्या २९९ कांड्या जप्त : दोघांना अटक
कल्याण क्राईम ब्रँचची कारवाई
(श्रीराम कांदु)
डोंबिवली- डोंबिवली जवळील खोणी गावातून दोघा इसमांकडून स्फोटकाच्या कांड्या जप्त करण्यात आलेत. अशोक ताम्हाणे आणि मारुती धुळे अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून, ते दोघेही कर्जतचे रहिवाशी आहेत. या दोघांकडून जिलेटीनच्या १९९ आणि डीटोनेटर्स १०० अश्या २९९ कांड्या हस्तगत करण्यात आल्यात. ही कारवाई कल्याण क्राईम ब्रँचचे प्रमुख संजू जॉन, एपीआय संतोष शेवाळे, दत्त भोसले, राजेंद्र खिल्लारे, राजेंद्र घोलप आदी पथकाने ही कारवाई केली. हा साठा बाळगण्याचा त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारचा परवाना नसतानाही त्यांनी हा साठा कुठून व कश्यासाठी आणला याचा दहशतवादी व नक्षलवादी करवायांशी काही संबंध आहे का याचा पोलीस तपास करीत आहेत.
Please follow and like us: