डोंबिवलीत सराफ व्यापाऱ्यावर गोळीबार
डोंबिवली दि.०३ – डोंबिवलीच्या मानपाडात एका सराफ व्यापाऱ्यावर गोळीबार करुन लुटण्याचा प्रयत्न झाल्याची घटना गुरुवारी रात्री उशीरा घडली असून कामगार या हल्ल्यातून बचावला मानपाडा येथील गावदेवी मंदिर परिसरातील रमेश गोल्ड या ज्वेलर्सचे मालक रमेश नहार आणि त्यांचा कर्मचारी प्रदीप जैन हे गुरुवारी रात्री उशीरा दुकान बंद करुन काही दागिने घेऊन घरी निघाले होते. दरम्यान, पाळत ठेऊन दोन अज्ञात तरुणांनी चोरीच्या उद्देशाने प्रदीप जैन यांच्यावर गोळीबार केला.
मात्र, गोळीचा नेम चुकल्याने प्रदीप यातून बचावला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे घाबरलेल्या रमेश नहार आणि प्रदीप जैन यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.हा आरडाओरडा ऐकून जवळच्या नागरिकांना त्यांच्याकडे धाव घेत चोरट्यांवर झडप घालून त्यांना पकडले आणि चांगलाच चोप दिला तसेच टिळकनगर पोलिसांच्या ताब्यात दिले.
रात्री उशीरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, डोंबिवलीत गेल्या काही दिवसांत असा लुटीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.याप्रकरणी टिळकनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळी लागली नसल्याने कामगार या हल्ल्यातून बचावला असला तरी झटपटीमुळे त्याच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. दरम्यान, ही घटना पाहणाऱ्या नागरिकांनी या हल्लेखोर चोरट्यांना पकडून चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केले. याप्रकरणी टिळकनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.