डोंबिवलीत श्रीराम नवमी उत्साहात साजरी 

श्रीराम नवमीनिमित्त रामजन्मोत्सव व विविध कार्यक्रम सपन्न

(श्रीराम कांदु)
डोंबिवली – येथिल रामनगर भागात असलेल्या पोलीस ठाण्यात, आफळे  राम मंदिरात, तसेच चिपळूणकर क्रॉस रोडवरील मंदिरात, बाजीप्रभू चौकातील  मंदिरात वर्षानुवर्षे श्रीराम नवमीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जाते.आजही हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला 
श्री हरी स्वामी समर्थ सेवा मंडळ संचालित गोविंदानंद श्रीराम मंदिरात, पारंपरिक पद्धतीने पाळणा हलवून सुंठवडा प्रसाद दिला जातो, राम जन्मला ग सखे राम जन्मला हे पावन भजन देखी आवर्जून म्हंटले जाते, दिवसभर पाळणा दर्शनासाठी ठेवला जातो असे विविध उपक्रम या मंडळात होत असल्याने भक्तांचा ओढा या ठिकाणी दिसून येतो.तसेच विविध मंदिरामध्ये पहाटेपासूनच राम नामाचे महत्व सांगणाऱ्या भजनाचा शुभारंभ झाला आहे. आरंभी वंदीन,या गाण्यामुळे ठिकठिकाणी वातावरण भक्तिमय झाले आहे. विविध उपक्रमामध्ये रामनाप जप, भजन, कीर्तन, राम जन्माचा पाळणा त्यावेळी म्हंटली जाणारी भजन यामधून श्री  राम नवमीचा उत्सव मोठ्या थाटामाटात करण्याचा प्रयत्न सालाबादप्रमाणे यंदाही डोंबिवलीकरांनी  केल्याचे दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published.