डोंबिवलीत व्यावसायिकाला बेदम मारहाण
(श्रीराम कांदु)
कल्याण – डोंबिवली पुर्वेकडील मानपाडा रोड संदप गाव लोढा पार्क येथे राहणारे भास्कर गुप्ता हे काल सकाळी आपल्या लोढा रिजेसी येथील कार्यालयात बसले असताना अचानक याच परिसरात राहणारे हरीश भोईर व त्याचे आठ ते दहा साथीदार कार्यलयात आले त्यांनी गुप्तां याना शिवीगाळ करत ठोशाबुक्क्यांनी लोखंडी रॉड ने मारहाण करण्यास सुरुवात केली त्यानंतर गुप्ता यांना आपल्या गाडीत जबरदस्तीने बसवून बदलापूर रोड वरील एक ढाब्याच्या मागे नेऊन बेदम मारहाण केली . या प्रकरणी गुप्ता यांनी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसानी हरीश भोईर सह त्याच्या आठ ते दहा साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे .
Please follow and like us: