डोंबिवलीत वाहतूक पोलिसांनी केली विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती

 डोंबिवली –  कर्णकर्कश हॉर्न वाजविल्याने होणाऱ्या दुष्परिणामवर समाजात अजुन जागरूकता नाही. त्यामुळे उपप्रादेशिक परिवहन विभागाचे संजय ससाणे , डोंबिवली वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गोविंद गंभिरे, इगल ब्रिगेड फांडेशनचे संस्थापक विश्वनाथ बिवलकर यांनी डोंबिवलीतील प्रगती महाविद्यालयात प्राचार्य डॉ.अशोक महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली `नो हॉकिंग`बाबत डोंबिवलीत वाहतूक पोलिसांनी केली विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या वाहतुकी संदर्भात उपस्थित अधिकार्यांनी समाधानकारक उत्तरे दिली.

   `नो हॉकिंगमुळे मानसिक ताण , उच्च रक्तदाब , हृद्यरोग , बहिरेपणा इत्यादी शारीरिक व्याधी होऊ शकतात. याबाबात प्रगती महाविद्यालयात जनजागृती करण्यात आली. यावेळी सुमारे ५०० विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी वाहतुकी संदर्भात अनेक प्रश्न विचारले असता वाहतूक पोलिसांनी माहिती दिली. दुचाकी वाहन चालविताना  हेल्मेट घालणे , चारचाकी वाहने चालविताना सीटबेल्ट लावणे, सिग्नल तोडू नये , वाहन चालविताना गतीचा वेग कमी असावा , वाहन चालविताना नेहमी लायसन्स जवळ ठेवावे या अश्या प्रकारची माहिती दिली.विशेष म्हणजे शांतता क्षेत्रात वाहन चालविताना हॉर्न वाजवू नये असे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गोविंद गंभिरे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.तसेच वाहतूक पोलिसांनी वाहनचालकांना वाहतूक नियमबाबतचे पत्रक देण्यात आले.यावेळी अनुप इनामदार, चंद्रशेखर कर्वे , जितेंद्र आमोणकर , ओजस ठोंबरे , समीर कांबळी , सुहास परब , सुजित  माधवन , चांदसरकर , राहुल नाले, संजय गायकवाड  यांचे सहकार्य लाभले.

  विद्यार्थ्यांनी `नो हॉकिंग`ची विद्यार्थ्यांनी घेतली  शपथ

   प्रगती महाविद्यालयात वाहतूक नियमसंदर्भात जनजागृती केल्यानंतर विद्यार्थ्यांनी `नो हॉकिंग`ची विद्यार्थ्यांनी  शपथ घेतली तरुण वर्गानी याबाबत पुढाकार घातला तर आणि वाहतूक नियमाचे पालन  केले तर शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत राहील असे यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गोविंद गंभिरे यांनी सांगितले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email