डोंबिवलीत राष्ट्रीय एकता दिवस साजरा
(श्रीराम कांदु )
ईगल ब्रिगेड फाउंडेशन यांनी 31 ऑक्टोबर राष्ट्रीय एकता दिवस अनुषंगाने शनिवार दि. 28 ऑक्टोबर रोजी डोंबिवलीतील जोंधळे महाविद्यालयाच्या सभागृहात राष्ट्रीय एकात्मता दिवस साजरा केला. यावेळी ईगल ब्रिगेड संस्थापक विश्वनाथ बिवलकर यांनी ‘भारताची एकात्मता, अखंडता व सर्वधर्मसमभाव हीच आपली ताकद आहे. या आधारावर आपण कोणत्याही आव्हानांचा मुकाबला समर्थपणे करू शकतो. असे सांगितले.
त्यासाठी आपण सर्वांनी एकत्र पुढाकार घेणे खुप महत्वाचे आहे. या बैठकीत एकता अबाधित ठेवण्यासाठी कोणते उपक्रम करता येतील तसेच ते कशाप्रकारे राबवले जातील याबाबत सविस्तर चर्चा झाली. याचवेळी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त त्यांचे स्मरण करण्यात आले. या बैठकीत संस्थापक विश्वनाथ बिवलकर तसेच चंद्रशेखर कर्वे, अजिंक्य देशमुख, समीर कांबळी, राजेश माने, शंतनु सावंत, सुहास परब, चिराग ठक्कर, सुजीत माधवन, प्रवीण बेटकर व सार्थक व इतर सदस्य उपस्थित होते. भारत सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 2014 मध्ये 31 ऑक्टोबर हा दिवस राष्ट्रीय एकता दिवस म्हणुन घोषित केला. सरदार वल्लभभाई पटेल यांचे स्मरण करणे हा यामागचा हेतू आहे. कारण त्यांनी भारताची एकात्मता कायम रहावी यासाठी खुप परीश्रम घेतले आहेत. तसेच 31 ऑक्टोबर रोजी इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांचे देखील स्मरण करण्यात आले.
Please follow and like us: