डोंबिवलीत रात्री भंगार विक्रेत्याची हत्या
डोंबिवली दि.१२ – डोंबिवली औद्योगिक निवासी भागात असलेल्या अक्षय गॅस एजन्सी दुकानासमोर भंगार गोळा करणाऱ्या दिपक रामगोपाळ चौहान (१८ ) याची त्याचा हातगाडीवर निघृण हत्या केल्याचे उघड झाल असून हत्येचे गूढ मात्र अजूनही कायम आहे. एक दिवस अगोदर आपला भाऊ बेपता झाल्याची तक्रार शाम चौहान याने मानपाडा पोलीस ठाण्यात केली होती आणि सकाळी दहा वाजता त्याचा मृतदेह त्याच्या हातगाडीवरच सापडला.
हेही वाचा :- डोंबिवली ; पत्नीचा छळ करणाऱ्या सैन्य अधिकाऱ्याला बेड्या
निवासी भागातील आर एम ४३ येथे एका भंगार विक्रेत्याची रात्री अज्ञात मारेकऱ्याने हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. मानपाडा पोलीस तपास करत असून सायंकाळी पाच पर्यत पोलीस ठाण्यात नोंदही करण्यात आली नव्हती वारंवार संपर्क करुनही पोलीस तपास चालू असल्याची टेप वाजवत आहेत. दिपक चौहानचा मृतदेह शवचिकित्सेसाठी रुक्मिीणीबाई रुग्णालया नेण्यात आला.