डोंबिवलीत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली
डोंबिवली दि.२१ – राज्यमंत्री रवींद चव्हाण आणि भाजप कल्याण डोंबिवली शहर जिल्हाच्या वतीने यांच्यावतीने देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना डोंबिवलीतील सर्वेश सभागृहात श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण , माजी मंत्री जगन्नाथ पाटील, कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे , डोंबिवलीचे माजी नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी, स्थायी समिती सभापती राहुल दामले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद डोंबिवली अध्यक्ष मिहीर देसाई. कांतकाका , शिवसेनेचे डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे, नशिक जिल्हा संघटक भाऊसाहेब चौधरी, श्री गणेश मंदिर संस्थानचे अच्युतराव क-हाडकर, अभाविपचे मिहिर देसाई, पदमाकर कुलकर्णी नगर सेवक राष्ट्रीय स्वयंमसेवक संघा व भारतीय मजदूर संघाच्या कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, अटलबिहारी वाजपेयी यांचे निर्णय धाडसी होते.भाजपमधील आदर्श वाजपेयी होते.डोंबिवली शहराला वेगला विचारांचा देउन गेले.त्यांच्या योजना राबविणे हि त्यांच्यासाठी श्रद्धांजली आहे. डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा ज्यांना सहवास लाभला ते भाग्यवान आहेत.
अटलबिहारी वाजपेयी आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे समाजाला मोठा विचार देउन गेले.माजी नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी यांनी डोंबिवली शहराबाबत अटलजीकडे विषय काढला कि ते खूप भावूक व्हायचे असे सांगून त्यासंदर्भात आठवण सांगितली. स्थायी समिती सभापती राहुल दामले म्हणाले, अटलजींच्या निधनाची बातमी जेव्हा समजली तेव्हा सर्वसामान्य नागरिकांमध्ये हळहळ निर्माण झाली त्यावरून त्यावरून अटलजींविषयी असलेले प्रेम दिसून येते.