डोंबिवलीत महिलांसाठी स्वतंत्र ई-टॉयलेट पर्यावरणपूरक अद्यावत सुविधांनी सज्ज

डोंबिवली दि.१८ – कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रभाग क्रमांक ६० च्या नगरसेविका मनीषा धात्रक यांनी नगरसेवक निधीच्या माध्यमातून महिलांसाठी स्वतंत्र पर्यावरणपूरक ई-टॉयलेट सुरू झाले. ज्येष्ठ महिलांसमवेत मनीषा धात्रक यांनी फीत कापून ई-टॉयलेटचे लोकार्पण केले. यामध्ये वॉश बेसिन,स्वयंचलित लाईट व पंखे, दिव्यांग व्यक्तींसाठी स्वतंत्र रॅम्प, पूर्णपणे यांत्रिकी पद्धतीचा अवलंब,यांत्रिकी पद्धतीने स्वयंचलित पद्धतीने होणारी नियमित साफसफाई ही या ई-टॉयलेटची वैशिष्टय़े आहेत.

सध्या रेल्वे स्थानकात एकही शौचालय सुसज्ज स्थितीत नाही. त्यामुळे विविध वैशिष्ट्यपूर्ण सोयीसुविधा असलेले हे अद्ययावत टॉयलेट शहरात आकर्षणाचा विषय झाला आहे. इतर रेल्वे स्थानक परिसरातही अशाप्रकारे ई -टॉयलेट उभारावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. उदघाटनप्रसंगी भाजपाचे नगरसेवक शैलेश धात्रक व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. अनेकदा महिलांसोबत लहान मुलेही असतात. अशावेळी बालकांना स्तनपान करता यावे म्हणून या ठिकाणी विशेष सोय करण्यात आली आहे. तसेच गरोदर स्त्रियांसाठी व महिलाना इतर अडचणी उद्भवल्यास चेंजिंग रूम आणि रेस्ट रुमचीही सोय या ठिकाणी आहे. उपलब्धतेनुसार एक, दोन किंवा पाच रुपयांचा कॉईन टॉयलेटच्या दरवाजावरील कॉइन बॉक्स मध्ये टाकल्यावर दरवाजा उघडला जातो. स्टेशन परिसरात महिलांकरिता एकही सुसज्ज असे टॉयलेट नव्हते. या टॉयलेट मध्ये एकाच वेळी अनेक सुविधांचा लाभ महिलाना घेता येणार आहे. यापुढेही असे स्तुत्य उपक्रम राबविण्यात येतील असे भाजपा नगरसेविका मनीषा धात्रक यांनी सांगितले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email