डोंबिवलीत मनसेच्या मॅरेथॉनमध्ये ज्येष्ठ नागरिकांचा उत्फूर्त प्रतिसाद 

(श्रीराम कांदु)

डोंबिवली –  महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहर आणि रोटरी क्लब ऑफ डोंबिवली एलिट यांच्या सयुंक्त विद्यमाने पार पडलेल्या डोंबिवली मँरेथॉन २०१८ मध्य सुमारे ५०० डोंबिवलीकर ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला. विशेष म्हणजे या स्पर्धेत  ९२ वर्षांचे स्वातंत्र्यसैनिक राजाराम राणे, ८८ वर्षांचे अनंता काळु भोईर काका, सर्वात पहिली डोंबिवली लोकल चालवणारे भोकरे हे सहभागी झाले होते.

    या स्पर्धेत मानसी मोरे,नील मॅथ्यु,अक्षय पवार,हर्ष फाफळे,प्रांजळ पुराणिक,सौमित्र बेंडाळे, मनेश गाढवे,रोशन खेतीयार हे नॅशनल लेव्हलचे ॲथलिट सदर मॅरेथॉनला उपस्थित होते.तसेच भोईर जिमखान्याचे संस्थापक मुकुंद भोईर, टिळकनगर विद्यालयाच्या लिना ओक-मॅथ्यु मॅडम,रोटरी क्लब आफ डोंबिवली एलिटचे सर्व सदस्य उपस्थित होते. पूर्वेकडील आप्पा दातार चौकातून सुरु झालेली  ही स्पर्धा ६ गटात घेण्यात आली होती . सदर प्रसंगी माजी आमदार रमेश  पाटील,प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम,तात्या गंभीरराव,हर्षद पाटील,प्रकाश माने,सुदेश चुडनाईक,विरोधी पक्ष नेते मंदार हळबे,माजी नगरसेवक मनोज राजे, निलेश भोसले,दिपक शिंदे,सागर जेधे तसेच मनसे पदाधिकारी सहकारी मोठ्या संख्येंने उपस्थित होते. डोंबिवली मॅरेथॉन यशस्वी होण्यासाठी मनसे नेते प्रमोद (राजु) पाटील,जिल्हाअध्यक्ष प्रकाश भोईर,परिवहन समिती सदस्य प्रल्हाद म्हात्रे,उद्योजक प्रदीप रुंगठा,शहर संघटक संजीव ताम्हाणे,नाहर हॉस्पिटलचे दिनेश हिरामण पाटील, ईश्वर हॉस्पिटलचे नरेंद्र जैन यांनी विशेष सहकार्य केले.

स्पर्धेचे विजेते:- 

गट क्र ०१:- पुरुष (वय ६० ते ६५)

पहिला क्र.:- श्री. अजित कांबोज दूसरा क्र.:- श्री. रामचंद्र शिर्के तिसरे क्र.:- श्री. नाना आसावलेचौथे क्र.:- श्री. अजित चौधरी

पाचवे क्र.:- श्री. मोतीराम आयरे

गट क्र ०२:-  पुरुष (वय ६६ ते ७१)

पहिला क्र.:- श्री. हेमकांत दाहोत्रे दूसरा क्र.:- मोहम्मद गफार तिसरे क्र.:- श्री. उमेश कुलकर्णी चौथे क्र.:- श्री. के. एस. भास्करन

 पाचवे क्र.:- दत्तात्रय गावडे

गट क्र ०३:- पुरुष (वय ७२ पुढे) पहिला क्र.:- श्री. रामचंद्र मिस्त्री दूसरा क्र.:- श्री. गोविंद बोंडे तिसरे क्र.:- श्री. धाकू परब चौथे क्र.:- श्री. खेमचंद तळेले पाचवे क्र.:- श्री. वामन शिंदे

गट क्र ०४:- महिला ( वय ६० ते ६५) पहिला क्र.:- सौ. शोभा मोरे दूसरा क्र.:- सौ. ज्योती नाईक तिसरे क्र.:- सौ. स्मिता हेगडे

 चौथे क्र.:- सौ. मनिषा वैद्य पाचवे क्र.:- सौ. कांचन कानडे

गट क्र ०५:- महिला (वय ६६ ते ७१) पहिला क्र.:- सौ. उषा घेलानी दूसरा क्र.:- सौ. पद्मजा ढवरेकर तिसरे क्र.:- सौ. आशा दणाईत चौथे क्र.:- सौ. गीता वैद्य पाचवे क्र.:- सौ. ममता पुराणीक

गट क्र ०६:- महिला (वय ७२ पुढे) पहिला क्र.:- विद्या फडके दूसरा क्र.:- शिला राऊत तिसरे क्र.:- सौ. कल्पना पाटेकर चौथे क्र.:- सौ. रेणुका देढिया  पाचवे क्र.:- सौ. शुभदा कर्वे

सदर प्रसंगी माजी आमदार रमेश दादा पाटील,प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम,तात्या गंभीरराव,हर्षद पाटील,प्रकाश माने,सुदेश चुडनाईक,विरोधी पक्ष नेते मंदार हळबे,माजी नगरसेवक मनोज राजे,प्राजक्त पोतदार,माणिक म्हात्रे,निलेश भोसले,दिपक शिंदे,सागर जेधे तसेच मनसे पदाधिकारी सहकारी मोठ्या संख्येंने उपस्थित होते. डोंबिवली मॅरेथॉन यशस्वी होण्यासाठी मनसे नेते प्रमोद (राजु) पाटील,जिल्हाअध्यक्ष प्रकाश भोईर,परिवहन समिती सदस्य प्रल्हाद म्हात्रे,उद्योजक प्रदीप रुंगठा,शहर संघटक संजीव ताम्हाणे,नाहर हाॅस्पीटलचे दिनेश हिरामण पाटील,ईश्वर हाॅस्पीटलचे नरेंद्र जैन यांनी विशेष सहकार्य केले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email