डोंबिवलीत भिवंडीसारखी दुर्घटना होऊ शकते : दोन महिन्यात उभी केली जातेय पाच मजली इमारत

डोंबिवलीत भिवंडीसारखी दुर्घटना होऊ शकते : दोन महिन्यात उभी केली जातेय पाच मजली इमारत : स्थानिक नगरसेवक – पालिका अधिका-यांची डोळयावर पट्टी
डोंबिवलीत भिवंडीसारखी दुर्घटना होऊ शकते : दोन महिन्यात उभी केली जातेय पाच मजली इमारत
स्थानिक नगरसेवक – पालिका अधिका-यांची डोळयावर पट्टी
श्रीराम कांदू
डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिकेतील बेकायदा बांधकामाचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयात उभा असतानाही डोंबिवलीत बेकायदा बांधकामांचा धुमधडाका सुरू आहे. अवघ्या दोन महिन्यात पाच मजल्याच्या टोलेजंग इमारती उभ्या केल्या जात आहेत. भिवंडीत निकृष्ट बांधकामामुळे इमारत कोसळून चार जणांना जीव गमावावा लागल्याची घटना घडली आहे. त्यामुळे निकृष्ट बांधकामामुळे डोंबिवलीतही भिवंडीसारखी स्थिती उद्भवू शकते अशी भिती निर्माण झालीय. मात्र याकडे स्थानिक नगरसेवक आणि पालिका अधिका-यांनी डेाळयावर पट्टी बांधल्याने हजोरो रहिवाशांची जीव टांगणीला आहे.
सध्या डोंबिवली पश्चिमेतील ह व फ प्रभाग क्षेत्रात बेकायदा बांधकामांची कामे जोरदारपणे सुरू आहे. मात्र याकडे प्रभाग क्षेत्र अधिकारी यांनी पूर्णपणे कानाडोळा केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातय. ह व फ प्रभाग क्षेत्राच्या विभागात अवघ्या दोन महिन्यात पाच मजल्याची टोलजंगी इमारती उभी केल्या जात आहेत. अवघ्या आठ दिवसात दोन ते तीन स्लॅब भरले जात आहेत. निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले जात असल्याने भिवंडीसारखी परिस्थिती उद्भवण्यास वेळ लागणार नाही. अग्निशमन दलाची गाडीही जाऊ शकत नाही अशा चिंचोळया जागेत पटापट इमारती उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण ? असा सवाल उपस्थित होत आहे. बेकायदा बांधकाम करणारे माफीया करोडो रूपये कमवून जातात. मात्र त्यानंतर इमारतीतील गोरगरीब लोकांच्या गळयाशी फास लागत आहे. बेकायदा बांधकामांबाबत पालिका दप्तरी तक्रारी येऊ देऊ नका. लवकरात लवकर इमारत उभारून रहिवाशांना रूम द्या असे खुद्द पालिकेचे अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे बेकायदा बांधकाम करणा-यांना कुणाचीही भिती राहिलेली नाही. भिवंडीतील निकृष्ट बांधकामामुळे इमारत कोसळून अनेकांना जीव गमवावा लागलाय त्यामुळे डोंबिवलीत अशी उद्भवू नये यासाठी पालिका प्रशासन त्वरीत पावले उचलावीत अशी मागणी जोर धरू लागलीय.