डोंबिवलीत भारिपने युती सरकारचा केला निषेध सुतिकागृहाचे `नुतनीकरण`रखडले …
डोंबिवली दि.०१ – पालिकेचे सूतिकागृह नूतनीकरणासाठी रखडलेले असून या परिस्थितीला युती सरकार आणि पालिका प्रशासन जबाबदार असल्याचे सांगत शुक्रवारी सकाळी डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकात भारिप बहुजन महासंघाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. गरीब जनतेला न्याय देण्यास युती सरकारचा कमी पडल्याची टीका करत भारिप बहुजन महासंघाने निषेध केला. सूतिकागृह रूग्णालय लवकरात लवकर सुरु करावे आणि या रुग्णालयाला राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांचे नाव द्यावे अशी मागणी करण्यात आली.
भारतीय रिपब्लिकन पक्षाचे डोंबिवली शहर अध्यक्ष राहुल नवसागरे, डोंबिवली शहर महासचिव मिलिंद साळवे, उपाध्यक्ष सिद्धार्थ कनकुटे, सुरेंद्र ठोके, राजू तुपे, मुरलीधर कांबळे,नंदू पाईपराव, परमेश्वर वाघ, संतोष खंदारे, रामकिशन इंगे,विजय इंदोरे, लिंबाजी सुतारे, सचिन खरात,गौरव निकुंभे,शैलेश मिटकर, नीना मोरे. रेखा कांबळे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पालिका प्रशासन आणि सत्ताधारी पक्षाविरोधात आंदोलनकर्त्यांनी निदर्शने केली. यावेळी डोंबिवली शहर अध्यक्ष राहुल नवसागरे म्हणाले, युती सरकारचा गरीब जनतेला काहीही फायदा होत नाही.
डोंबिवलीत पालिकेच्या रुग्णालयाची अवस्था दयनीय असून सूतिकागृह पाच वर्षापासून बंद आहे. या रुग्णालयाच्या जागी खाजगीकरणाचा डाव असून हे आम्ही कदापि होऊन देणार नाही. हे रुग्णालय लवकरात लवकर सुरु झाले पाहिजे आणि या सूतिकागृहाला राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांचे नाव द्यावे अशी मागणी पालिका प्रशासनाकडे केली आहे. डोंबिवली शहर महासचिव मिलिंद साळवे यांनी यासंदर्भात महापौर विनिता राणे यांनी लक्ष द्यावे असे सांगितले. तर इतकी वर्ष सूतिकागृह बंद असल्याबाबत नीना मोरे यांनी पालिका प्रशासनाच्या उदासीनेबद्दल नाराजी व्यक्त केली.दरम्यान काही वेळाने रामनगर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन सोडून दिले.
हेही वाचा :- डोंबिवली स्टेशन परिसर सुधारणा ” करण्यासाठी विभागीय कार्यालयाचे स्थलांतर
२०१३ साली सूतिकागृहाच्या जिन्याचा एक प्लास्टर पडल्याने ही इमारत पालिकेने धोकादायक इमारत म्हणून जाहीर केली होती. त्यानंतर या बंद इमारतीच्या जागी नवीन रुग्णालय बांधण्यासाठी पालिकेला विलंब होते आहे. या इमारतीच्या जागेवर खाजगीकरणाचा डाव असून यामागे पालिका आणि काही बिल्डर लॉबी असल्याचा संशय भारिप डोंबिवली शहर अध्यक्ष राहुल नवसागरे यांनी व्यक्त केला आहे.