डोंबिवलीत भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन ….
पालिकेला टाळे ठोकण्याचा इशारा
(श्रीराम कांदु)
डोंबिवली – स्टेशनपरिसरातील अनधिकृत फेरीवाले आणि शहरात होणारे अनधिकृत बांधकामे यावर पालिका प्रशासन कारवाई करत नाही असा आरोप करत भाजप नगरसेवकांनी डोंबिवलीतील पालिकेच्या विभागीय कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनाला शिवसेनेच्या नगरसेविकेने पाठिंबा देत आंदोलनात सहभागी झाले होते. प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांनी फेरीवाल्यांवर कारवाई सुरु असल्याचे लेखी पत्र नगरसेवकांना दिले. मात्र पालिका प्रशासन या आंदोलनाची मस्करी करत आहे का असे सांगत पत्र फाडून फेकले. त्यानंतर अधिकाऱ्यांनी समाधानकारक पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेतले.
`ग` प्रभाग क्षेत्र समितीच्या सभेत नगरसेविका प्रमिला चौधरी यांनी ठाकुर्ली येथील स्टेशनपरिसरात अनधिकृत फेरीवाले बसत असून पालिका प्रशासन कारवाई करत नसल्याचा आरोप केला होता. यानंतर नगरसेविका प्रमिला चौधरी,माजी नगरसेवक श्रीकर चौधरी यांनी डोंबिवलीतील पालिकेच्या विभागीय कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनात प्रभाग क्षेत्र समिती सभापती खुशबू चौधरी, नगरसेवक निलेश म्हात्रे, राजन आभाळे, विश्वदीप पवार , मंदार टावरे, विशू पेंढणेकर, नितीन पाटील , नगरसेविका डॉ. सुनिता पाटील, अलका म्हात्रे सहभागी झाले. या आंदोलनात महिला आणि बालकल्याण समितीच्या नगरसेविका दिपाली पाटील यांनी पाठिंबा देत आंदोलनात सहभागी झाले. मात्र प्रभाग क्षेत्र अधिकारी अमित पंडित आणि परशुराम कुमावत यांनी फेरीवाल्यांवर कारवाई होत मात्र कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याचे स्पष्टीकरण केले.पालिकेचे फेरीवाल्यांवर अंकुश नसल्याने यांचा त्रास नागरिकांना होत आहे. ठाकुर्ली स्टेशन परिसरात दिवसेंदिवस फेरीवाल्यांची संख्या वाढत असून पालिका कारवाई करत नाही असा आरोप नगरसेविका प्रमिला चौधरी यांनी केला. शिवसेनेच्या नगरसेविका दिपाली पाटील यांनी पालिका फेरीवाल्यांवर करत नसल्याचे सांगितले. तर पालिकेने या आंदोलनाची गंभीर दाखल घेऊन फेरीवाल्यांवर कारवाई करावी अन्यथा पालिकेला टाळे ठोकू असा इशारा नगरसेवक निलेश म्हात्रे यांनी दिला. नगरसेवक विश्वदीप पवार यांनी एखाद्या फेरीवाल्यांनी एखाद्या पक्षाचा झेंड्याखाली माल विकला तर त्यावर कारवाई का करत नाही असा प्रश्न यावेळी उपस्थित केला. हे आंदोलन स्टंटबाजी नसून नागरिकांना फेरीवाले मुक्त स्टेशनपरिसर हवा असल्याने आज हे पाउल उचलावे लागल्याचे सभापती खुशबू चौधरी यांनी यावेळी सांगितले.
डोंबिवली स्कायवॉकखाली रात्री ९ नंतर भुर्जीपाव आणि चायनीज गाडीवर दारू पिण्याचे प्रकार …
डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनजवळील स्कायवॉकखाली रात्री ९ नंतर भुर्जीपाव आणि चायनीज गाडीवर सर्रासपणे दारू पिण्याचे प्रकार सुरु आहे. हा प्रकार गेली तीन वर्ष सुरु आहे. मात्र पोलीस आणि पालिका प्रशासन याकडे डोळेझाक करत असून महिलांच्या सूरक्षततेच्या प्रश्न निर्माण झाल्याचे नगरसेवक नितीन पाटील यांनी सांगितले.
डोंबिवलीत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी प्रथमच भाजप नगरसेवकांचे आंदोलन
सत्ताधारी पक्ष महासभेत आंदोलन अथवा आक्रमक होत असतात. मात्र महासभेत अनेक वेळेला स्टेशनपरिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी सांगूनही पालिका याकडे गांभीर्याने लक्ष देत नाही. हा प्रश्न सुटावा म्हणून सत्तेतील मित्र शिवसेनेने स्टेशनपरिसरातील फेरीवाल्याचे समान रस्तावर फेकून दिले दिले. आता या प्रश्नावर भाजप नगरसेवकांनी प्रथमच आंदोलन केले.