डोंबिवलीत भटक्या कुत्र्यांची दहशत एका ८ वर्षाच्या मुलीवर अचानक ४-५ भटक्या कुत्र्यांनी केला हल्ला
डोंबिवली दि.०५ – डोंबिवलीत भटक्या कुत्र्यांची दहशत वाढली असून शुक्रवारी डोंबिवलीतील लोढा पलावा परिसरात एका ८ वर्षाच्या मुलीवर अचानक ४-५ भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला जवळपास ४-५ ठिकाणी भटक्या कुत्र्यांनी त्या चिमुकलीच्या शरीराचे लचके तोडले असून स्थानिक रहिवाशांनी त्या मुलीला कुत्र्यांच्या तावडीतून सोडवून तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेले आणि तिथे तिच्यावर
उपचार केले. माही सिंग असं या मुलीचं नाव असून ती याच पलावा परिसरात राहणारी आहे. या प्रकारामुळे स्थानिक रहिवाशी संतापले असून या भटक्या कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त न केल्यास मोठं आंदोलन करू असा इशारा स्थानिक रहिवाशांनी दिलाय. डोंबिवलीत भटक्या कुत्र्यांची दहशत आता लहान मुलांच्या जिवावर आली असून रोज अशा घटना घडत आहेत. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त पालिका प्रशासन का करत नाही? असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय.