डोंबिवलीत ब्राह्मण ज्ञातींचे एकत्रिकरण
(श्रीराम कांदु)
डोंबिवली – जातीपातीचे राजकारण योग्य नाहीच, त्यातही द्वेषाने वागणून देणे अथवा अपमानास्पद बोलणे कधीही उचित नाही. त्यामुळे यापुढे अन्याय खपवून घेतला जाणार नाही. अन्याय कोणावरही करायचा नाही आणि करवूनही घ्यायचा नाही. डोंबिवलीत संपन्न झालेल्या ब्राह्मण महासंघाच्या बैठकीत एकमताने हे ठरवण्यात आले. ब्राह्मणांनीही एकत्र येण्याची नितांत गरज असून त्यासाठी डोंबिवलीसह परिसरातील ब्राह्मणांनी एकत्र यावे, संघटीत व्हावे असे आवाहन ब्राह्मण महासंघाच्या वतीने करण्यात आले.
नव्या कार्यकारणीच्या पहिल्या बैठकीत महिला समिती, शिक्षण समिती, सांस्कृतिक समिती, जनसंपर्क आणि प्रसिद्धी समिती, युवा समिती अशा समिती नेमण्यात आल्या असून आगामी बैठकीत त्या समितीमध्ये कार्यरत असणा-या कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले
ब्राह्मणांनी एकत्र येणे ही काळाची गरज असून संघटीतपणे कार्यरत असणे आवश्यक आहे, त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने ज्ञातींसह महासंघाचे सभासद व्हा असे आवाहन यावेळी करण्यात आले.
Please follow and like us: