डोंबिवलीत बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाई

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.२२ – विना परवाना आणि बेशिस्त रिक्षाचालकांवर गुरुवारी दुपारी उपप्रादेशिक परिवहन विभाग डोंबिवली वाहतूक शहर शाखेच्या वतीने कारवाई करण्यात आली.या कारवाईमुळे रिक्षाचालकांची पळता भुई थोडी झाली. दररोज अश्या कारवाईची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

उपप्रादेशिक परिवहन विभागाचे मोटर वाहन निरीक्षक गणेश जोशी, जयंवत कोंदेकुले , डोंबिवली वाहतुक शहर शाखेचे पोलीस निरीक्षक गोविंद गंभीरे, पोलीस हवालदार मारुती भारती, प्रोटेस्ट अंगेंस्ट रिक्षावाला संघटनेचे देशपांडे यांनी सदर कारवाई केली.डोंबिवली पश्चिमेकडील दौरका हॉटेल चौक , विष्णूनगर मच्छिमार्केट रोड, फुले रोड आणि पूर्वेकडील स्टेशनजवळील रामनगर परिसरात अचानक कारवाईला सुरुवात झाल्याने रिक्षाचालकांची तारांबळ उडाली.या कारवाईत २२रिक्षाचालकांना कागदपत्र पडताळणीसाठी समज , २ रिक्षाचालक विनापरवाना रिक्षाचालवित असताना सापडल्याने रिक्षा जमा आणि १६ रिक्षा जमा करण्यात आल्या.बेशिस्त रिक्षाचालक , नेमून दिलेल्या स्टँडवर रिक्षा न लावणे, प्रवाशांशी उध्द्तपणे वागणे, जाब विचारणाऱ्या प्रवाशांच्या अंगावर संघटितपणे धावून जाणे, जवळचे भाडे नाकारणे अश्या अनेक तक्रारी आल्याने ही कारवाई केल्याचे पोलीस निरीक्षक गंभीरे यांनी सांगितले. कारवाई पकडलेल्या अनेक रिक्षाचालकांनी गणवेश परिधान न करता सध्या कपड्यात रिक्षाचालवत असल्याचे दिसून आले.या कारवाईची माहिती लीक होऊ नये म्हणून गुप्तता घेण्यात आली होती.वाहतूक शहर शाखेच्या भिंतींनाही कान असल्याने काळजी घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

यापुढे रात्रीच्या वेळी धडक कारवाई

डोंबिवलीत रात्रीच्या वेळी प्रवाश्यांची सेवा करण्या ऐवजी रिक्षात रंगीबेरंगी लाईट लावून मोठ्या आवाजात डेक लावत रोडरोमियोसारखे रिक्षाचालक फिरत असतात.काही रिक्षाचालक दारू पिऊन भरधाव रिक्षा चालवीत असतात.१८ वर्षाखालील किशोरवयीन मुले रिक्षाकचालवीत असल्याने याबाबत विशेषतः महिलांच्या अनेक तक्रारी वाहतूक पोलिसांकडे आल्या आहेत.त्यामुळे यापुढे रात्रीच्या वेळी अश्या रिक्षचालकांवर धडक कारवाई करण्यात येणार आहे असल्याची माहिती पोलीस निरीक्षक गंभीरे यांनी दिली.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email