डोंबिवलीत बालकावर चाकूने हल्ला….

डोंबिवलीत बालकावर चाकूने हल्ला….

 

डोंबिवली :- दि.०१

डोंबिवलीतील एका ९ वर्षाच्या बालकावर चाकूने जीवघेणा हल्ला झाल्याची घटना शुक्रवारी दुपारच्या सुमारास घडली. भूषण सरोदे नामक बालक पूर्वेतील सावरकर रोडला राहतो. दुपारच्या सुमारास इमारतीच्या आवारात खेळत असताना एक अनोळखी इसम तेथे आला. या इसमाने आडोश्याला नेऊन खिश्यातून काढलेल्या चाकूने गळ्यावर व हातावर चाकूने वार केले. मात्र या बालकाने हुलकावणी दिली. त्यामुळे गळ्यावरील वार निसटता बसल्याने बालकाचा जीव वाचला. तथापि या हल्ल्यात बालकाच्या दोन्ही बोटांना इजा पोहोचली आहे. डोंबिवली पोलिसांनी या बालकाच्या जबानीनुसार ओळखी हल्लेखोराच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. जखमी बालकाला हल्लेखोराचे वर्णन व्यवस्थित करता येत नसल्याने पोलिसांना हल्लेखोरापर्यंत पोहोचण्यासाठी मोठी पंचाईत झाली आहे. बालकावर चाकू हल्ला करण्यामागचे कारण अद्याप
स्पष्ट झाले नाही.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email