डोंबिवलीत फेरीवाले आणि रिक्षाचालकांत राडा
डोंबिवली दि.३० – डोंबिवली पूर्वेकडील चिमणी गल्लीत फेरीवाले आणि रिक्षाचालकांमध्ये जागेवरून हाणामारी झाल्याची मंगळवारी दुपारच्या दरम्यान घटना घडली. या घटनेने संतप्त झालेल्या रिक्षाचालकांनी पालिकेच्या डोंबिवली कार्यालयात मोर्चा काढला. चिमणी गल्लीतील फेरीवाल्यांना हटवा. अशी मागणी रिक्षाचालकांनी केली.
हेही वाचा :- कल्याण ; सोनसाखळी आणि मोबाईल लंपास
`ग`प्रभाग क्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत यांची रिक्षाचालकांची भेट घेऊन घडलेल्या प्रकारची माहिती देऊन येथील फेरीवाल्यांना हटविण्याची मागणी करण्यात करण्यात आली. याबाबत उप प्रादेशिक परिवहन अधिकारी ससाणे यांना विचारले असता अधिकृत- अनधिकृत रिक्षा थांब्यांबाबत अद्याप महापालीकेची धोरण ठरले नसून पालिकेकडे थांब्यांची संपूर्ण यादी पाठविण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेच्या निर्णयानंतर अधिकृत थांबे जाहीर केले जातील.