डोंबिवलीत पोलिसांनी अडविला फेरीवाल्यांचा मोर्चा

डोंबिवलीत पोलिसांनी अडविला फेरीवाल्यांचा मोर्चा …

डोंबिवली :- दि. २१ ( प्रतिनिधी ) आपल्या विविध मागण्यासाठी डोंबिवलीतील पालिकेच्या विभागीय कार्यालयात गुरुवारी सुमारे हजार फेरीवाल्यांनी काढलेला मोर्चा पोलिसांनी अडविला.  कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण  होऊ शकतो असल्याचे कारण पोलिसांनी पुढे केले असले तरी फेरीवाला युनियनच्या पदाधिकार्यांनी मात्र शांततेच्या मार्गाने निघणाऱ्या आमच्या मोर्च्याला पोलिसांनी आडकाठी घालणे चुकीचे असल्याचे सांगितले. त्यानंतर फेरीवाला  युनियनच्या शिष्टमंडळाने विभागीय कार्यालयात पालिकेचे सहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते यांच्याशी चर्चा केली. मात्र समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने संतापलेल्या शिष्टमंडळाने आता आपली भेट न्यायालयात होईल तिकडे उत्तरे द्या असा इशारा दिला.

     कष्टकरी हॉकर्स युनियनचे अध्यक्ष बबन कांबळे , सल्लागार प्रशांत सरखोत, महिला अध्यक्षा मधु बिरमुळे, दोस्ताना ग्रुपचे अभय दुबे यासह अनेक फेरीवाल्यांनी डोंबिवली पश्चिमेकडील सम्राट चौकापासून मोर्चा काढण्यास सुरुवात केली. मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो असे कारण देत सहाय्यक पोलीस आयुक्त रविद्र वानखेडे यांच्या आदेशानुसार पोलिसांनी कोपरब्रिजवर मोर्चा अडविला. त्यानंतर विष्णूनगर पोलीस ठाण्यात मोर्चेकऱ्याना नेण्यात आले. आता आम्हाला अटक करा अशी असे मोर्चेकऱ्यानी पोलिसांना सागितले असता  वपोनी राजेंद्र मुणगेकर यांनी मध्यस्थी घेऊन पालिकेचे सहाय्यक आयुक्त सुहास गुप्ते यांच्याशी फेरीवाल्यांच्या शिष्टमंडळाने चर्चा करण्यास सांगितले. या चर्चेत फेरीवाल्यांचे शिष्टमंडळ आणि गुप्ते यांच्यात वाद झाला. बुधवारी केडीएमसीने आयुक्तांच्या परवानगीने डोंबिवली पश्चिमेला सात आणि पूर्वेला सात ठिकाणी स्टेशनपासून १५० मीटर अंतरावर पांढरे पट्टे मारले. मात्र पालिका बेकायदेशीर काम करत असून पालिकेने यासाठी एक समिती स्थापन करणे आवश्यक असताना पालिका फक्त फेरीवाल्यांना हटवण्यावर जास्त लक्ष देत असल्याचे कष्टकरी हॉकर्स युनियनचे सल्लागार प्रशांत सरखोत यांनी सांगितले. तर अध्यक्ष बबन कांबळे यांनी पालिकेच्या फेरीवाला हटाव पथकाने फेरीवाल्यांचा पकडलेला माल पंचनामा  करून पावती बनविल्यानंतर सोडून देणे बंधनकारक असताना असे होत नसल्याचा आरोप केला. तर मधु बिरमुळे यांनी पालिका बेकायदेशीरपणेकाम करत असल्याचे यावेळी स सांगितले.

चौकट

  पालिकेने स्टेशनपासून १५० अंतरावर पांढरा पट्टा मारल्यानंतर पट्ट्याजवळ जागा मिळवण्यासाठी फेरीवाल्यांमध्ये भांडणे झाली. पश्चिमेकडे दोस्ताना ग्रुपचे अभय दुबे फेरीवाल्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. जागेवरून  फेरीवाल्यांमध्ये मारामारी होण्याची शक्यता असून याला पालिका प्रशासन जबाबदार असल्याचे दुबे यांनी सांगितले

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email