डोंबिवलीत पालिका वाट पाहतेय खड्याचा बळी.
डोंबिवलीत पालिका वाट पाहतेय खड्याचा बळी…
डोंबिवली :-
काही दिवसांपूर्वी खंबाळपाडा येथील एक रत्यावरील खड्ड्यात पडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेनंतरही पालिका प्रशासनाचे डोळे उघडले नाहीत. डोंबिवली स्टेशनजवळील केळकर पथावर रस्त्या कॉंक्रीटीकरणाच्या कामात खोदलेल्या खड्यात दुचाकीस्वार पडून जखमी होण्याची शक्यता आहे. डोंबिवलीकरांनी पालिकेच्या या बेजबाबदार कामाबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तर यावर एकही राजकीय पक्षाने आवजा का उठवला नाही याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या परिस्थितीमुळे पालिका खड्याचा आणखी एक बळीची वाट पाहतेय का असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अनेक दिवसांपासून डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनजवळील केळकर रोडवर रस्ता कॉंक्रीटीकरणाचे काम सुरु आहे. या रस्त्यावर नाले बांधण्याचे काम करण्यासाठी खड्डा खणला आहे. या रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यत एक दिशा मार्ग करण्यात आला आहे. त्यामुळे खड्याला चुकवून दुचाकीस्वारांना आणि नागरिकांना जावे लागते. दुर्दैवाने या खड्ड्यात पडून एखादा दुचाकीस्वार पडून जखमी होऊ शकतो याची कल्पना पालिका प्रशासनाला असूनही खड्ड्यात कोणी पडू नये म्हणून काहीही व्यवस्था केली नाही. यावर काही महिलांनी नाराजी व्यक्त करत कोणी या खड्ड्यात पडल्यास याची जबाबदारी पालिका प्रशासनाची असेल असे सांगितले.
Please follow and like us: