डोंबिवलीत नव्याने बनविण्यात आलेल्या रस्त्यावर खड्डा …

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.२९ – नव्याने बांधण्यात येत असलेल्या रस्त्याच्या कामाचा दर्जा आणि पालिका प्रशासनाचे लक्ष असणे आवश्यक असते. मात्र डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनजवळील केळकर रोडवर नव्याने बनविण्यात आलेल्या रस्त्यावर काही दिवसातच मोठे खड्डे पडल्याने याला संबधित ठेकदार का पालिका प्रशासन जबाबदार असा प्रश्न डोंबिवलीकरांनी उपस्थित केला आहे.

नियमानुसार एखाद्या रस्त्याचे काम सुरु असताना त्याठिकाणी संबंधित ठेकेदाराचे नाव, किती दिवसात रस्त्याचे काम पूर्ण होणार आणि या कामासाठी किती निधी वापरला गेला याची फलकावर माहिती लिहिणे बंधनकारक असते. मात्र कल्याण-डोंबिवली महानगरपालिका हद्दीत या नियमाचे पालन होत नाही. नव्याने बनविलेल्या रस्त्यामध्ये काही दिवसात खड्डे पडल्यास ते ठेकेदारानेच स्वःखर्चाने बुजवणे असाही नियम असताना त्याचेही पालन होत नसल्याचे दिसते. डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनजवळील केळकर रोडवरील रस्ताच्या कॉंक्रीटीकरनाचे काम पूर्ण होऊन वर्ष उलटले नाही तोवर या रस्त्यावर मोठा खड्डा पडला आहे. त्यामुळे या खड्यातून वाहने जात असल्याने भविष्यात अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याला जबाबदार संबंधित ठेकेदार असल्याने याचा जाब मात्र पालिका प्रशासनाने अद्याप विचारलेला नाही. यावरून ठेकेदाराच्या निकृष्ठ कामांना पालिका प्रशासन पाठीशी घालत असल्याचे ओरड नागरिकांकडून सुरु झाली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email