डोंबिवलीत नगरसेवकाच्या पत्नीवर पिस्तुल रोखले ;  दोन अज्ञात व्यक्तींवर गुन्हा

डोंबिवली –डोंबिवली शहरातील आपापसातील वाद सध्या नको ते वळण घेताना दिसत आहेत.पूर्वी पर्यंत हे वाद केवळ पुरुषां पुरते मर्यादित असत.परंतु आता या वादात घरातील महिलांची सुरक्षा देखिल धोक्यात येवू शकते अशी परिस्थिति निर्माण होत असल्याची चर्चा शहरात होवू लागली आहे.भाजपचे नगरसेवक महेश पाटील यांची पत्नी पल्लवी आपल्या कुटुंबासह कार्यक्रम आटपून गाडीने घरी परतत असताना नगरसेवक कुणाल पाटील यांच्या ताफ्यात असलेल्या गाडीने त्यांचा रस्ता अडवून त्यातील एका अज्ञात व्यक्तीने आपल्यावर पिस्तुल रोखून जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री गाडी घरडा सर्कल येथे घडला. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपा नगरसेवक महेश पाटील आणि नगरसेवक कुणाल पाटील यांच्यात अनेक वर्षांपासून वाद सुरु आहे.वर्षभरापूर्वी नगरसेवक कुणाल पाटील यांनी नगरसेवक महेश पाटील यांना मारण्याची सुपारी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.तर हल्ली काही दिवसांपूर्वीच नगरसेवक कुणाल पाटील यांना मारण्याची सुपारी दिल्याप्रकरणी नगरसेवक महेश पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर ठाणे खंडणी विरोधी पथकाने गुन्हा दाखल करून अटक केली. पोलिसांनी महेश पाटील यांना अटक करून ते न्यायालयीन कोठडीत  आहेत.शुक्रवारी रात्री १२ च्या सुमारास नगरसेवक महेश पाटील यांच्या पत्नी पल्लवी आपल्या कुटुंब व मैत्रिणीसह सावित्रीबाई फुले नाट्यगृहातून कार्यक्रम आटपून गाडीने मैत्रिणीला घरी सोडण्यासाठी आपल्या गाडीने घरडा सर्कल येथून जात होत्या. इतक्यात नगरसेवक कुणाल पाटील यांच्या ताफ्यासोबत नेहमी असलेल्या सिल्वर रंगाच्या इनोव्हा गाडीने त्यांचा रस्ता अडवून त्यातील एका अज्ञात व्यक्तीने आपल्यावर पिस्तुल रोखून धमकी दिल्याचे पाटील यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी त्यांच्या जबानीवरून  अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.या प्रकरणी नगरसेवक कुणाल पाटील यांच्याशी संपर्क साधला असता,आपल्यावरील लावलेल्या आरोपाचा इन्कार करून हा प्रसिद्धीचा बनाव असून आम्ही सर्व कुटुंबीय बाहेर लग्न सोहळ्यासाठी गेलो होतो असे पत्रकारांना सांगितले

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email