डोंबिवलीत दोन घरफोड्या

कल्याण – कल्याण डोंबिवली मध्ये घरफोडीचे सत्र सुरुच असून काल दिवसभरात डोंबिवली मध्ये दोन घरफोड्या झाल्या आहेत .ठाणे येथे राहणारे नारायन रावरिया यांचे डोंबिवली नजीक ठाकुर्ली येथे एकदंत सोसायटीमध्ये किराणा मालाचे दुकान आहे .मंगळवारी रात्री रावरीया नेहमीप्रमाणे दुकान बंद करत घरी निघून गेले होते
दुकानाला कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने त्यांच्या दुकानाचे शटर तोडून दुकानात प्रवेश करत दुकानातील किराणा सामान, तेलाचे तुपाचे डबे सह रोकड असा मिळून 60 हजारांचा मुद्देमाल लंपास केला .काल सकाळी दुकान उघडताना त्याना दुकानात चोरी झाल्याचे लक्ष्यात आले .या प्रकरणी रावरिया यांनी डोंबिबली पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याच शोध सुरू केला आहे .दुसरी घटना डोंबिवली पूर्वेकडील कल्याण शीळ रोड वैभव नगरी येथे राहणारे विष्णू लोखंडे 65 काल सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेले होते .ही संधी साधत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा मिळून एकूण 97 हजारांचा मुद्देमाल लांपास केला .दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास घरी परतल्या नंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले त्यांनी या प्रकर्णी मानपाडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरू केला आहे .

Leave a Reply

Your email address will not be published.