डोंबिवलीत दुर्मिळ मांडूळ जातीचे वन्यसर्प विक्री करणाऱ्या त्रिकुटास अटक

जप्त केलेले  दोन मांडूळ सुमारे २५ लाख किमतीचे

(श्रीराम कांदु)

डोंबिवली – काळी जादू आणि औषधी पदार्थच्या विक्रीसाठी दुर्मिळ मांडूळ जातीचे वन्यसर्प विक्री करणाऱ्या त्रिकुटास कल्याण गुन्हे अन्वेषण पथकाने सापळा रचून रात्री अटक केली.त्यांच्याकडून दोन मांडूळ जातीचे वन्यसर्पसह गुन्ह्यात वापरलेली स्कोर्पियो गाडी असा जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.नवनाथ विश्वास दायगुडे(24,रा.तरडोली,बारामती ),कुष्णा अनवती पारटे(35,रा.पोलादपूर) आणि प्रवीण चव्हाण (29,रा.पोलादपूर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

     कल्याण गुन्हे अन्वेषण पथकाचे प्रमुख संजू जॉन आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष शेवाळे यांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली कि,गुरुवारी रात्री कल्याण शिळ रोडवरील काटई टोलनाका परिसरात एका स्कोर्पिओ गाडीतून काही तरुण दुर्मिळ मांडूळ जातीचे वन्यसर्प विक्री करणाऱ्यास येणार आहेत.त्यानुसार शेवाळे यांच्या मार्गदशनाखाली पोलीस हवालदार दत्ताराम भोसले,राजेंद्र घोलप,नरेष जोगमार्गे,राजेंद्र खिल्लारे ,विश्वास चव्हाण,सतीश पगारे,प्रकाश पाटील,हर्षल बांगारा आदींनी सदर ठिकाणी रात्री 9 च्या सुमारास सापळा रचला.खबऱ्याने दिलेल्या वर्णनाची स्कोर्पिओ  गाडी येथाच तिला ताब्यात घेऊन या तिघांची चौकशी केली असता,त्यांनी प्रथम उडवा-उडवीची उत्तरे दिली.त्यानंतर त्याच्या गाडी तपासली असता,मागच्या बाजूच्या सीट खाली एका प्लास्टिक गोणीतून दोन दुर्मिळ मांडूळ जातीचे वन्यसर्प सापडली.त्यांची सद्या येथील बाजारभावा प्रमाणे सुमारे 25 लाख रुपये किंमत आहे.तसेच गुन्ह्यात वापरलेली सफेद स्कोर्पिओ गाडीही जप्त करण्यात आली आहे. हे दुर्मिळ मांडूळ काळी जादू आणि औषधी पदार्थसाठी वापर करतात.त्यामुळे यांच्या मागणी मोठ्या प्रमाणात मागणी होत असून त्यांची तस्करी केली जाते.आरोपींनी हे मांडूळ कोणाला देण्यास आणि कोठून आणले होते याचा तपास पोलीस करीत आहेत.सद्या पोलिसांनी या दोन्ही मांडूळांची देखभाल करण्यासाठी डोंबिवलीचे सर्पमित्र वैभव कुलकर्णी आणि संतोष पालांडे यांच्या निसर्ग विज्ञान संस्थाकडे सुपूर्द केले आहेत.त्यानंतर त्यांना कोर्टाच्या आदेशान्वये जंगलात सोडण्यात येईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email