डोंबिवलीत तीन ठिकाणी किरकोळ आग ,जीवित हानी नाही
डोंबिवली दि.२७ – मानपाडा रस्त्यावरील आयकॉन हॉस्पिटळजवळ असलेल्या डोमिनोझ पिझ्झा दुकान ,पश्चिम डोंबिवलीतील रामचंद्र भगत संकुल व महावितरण कंपनीचा ट्रान्सफार्म येथे अचानक आग लागली तिन्ही आग लागलेली विझवण्यात आली मात्र कुठेही जीवित हानी झाली नाही.
मानपाडा रस्त्यावरील रहदारीच्याकॉर्नरवर असलेल्या डोमिनोझ पिझ्झा दुकानातून दुपारी अचानक आवाज येऊ लागल्याने कर्मचारी व ग्राहक घाबरून बाहेर पळाले ,आतमधून मोठ्या प्रमाणात धूर येत होता व फटाके फुटल्यासारखे आवाज येत होते अग्निशमन दल तातडीने दाखल झाल्यावर त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले मात्र आगीचे कारण समजले नाही.
तर सकाळी शास्त्रीनगर पश्चिम डोंबिवलीतील रामचंद्र भगत संकुलातील नाईक कुटुंबाच्या घरातून धूर येऊ लागला त्या मुळे अग्निशमन दल आल्यावर त्यांनी दार तोडून आग नियंत्रणात आणली सकाळी कामावर जाताना गिझर चालू राहिल्याने शॉर्ट सर्किटने आग लागल्याचे सांगण्यात आले तसेच स्टेशन समोर एव्हरेस्ट शॉपिंग सेंटर जवळ असलेल्या ट्रान्सफार्मला अचानक आग लागली त्या ट्रान्सफार्मजवळ दुकाने व सिलेंडरची गाडी होती सुदैवाने कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. डोंबिवलीत तीन ठिकाणी आगी लागल्या त्यात वित्त हानी झाली असली तरी जीवितहानी झाली नाही