डोंबिवलीत “तालसंग्राम-2018 ” ढोलताशा स्पर्धा १४ ढोलताशा पथकांचा सहभाग

डोंबिवली :  आरंभ प्रतिष्ठान डोंबिवली तर्फे “तालसंग्राम २०१८ ” या ढोलताशा स्पर्धेचे प्रथमच आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा २७ व २८ जानेवारी रोजी होत असुन महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक क्रिडा विभागाने स्पर्धेची दाखल घेतली आहे. स्पर्धेसाठी सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांची प्रमुख उपस्थिती असेल अशी माहिती आरंभ प्रतिष्ठानचे अध्यक्ष निशांत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अध्यक्ष निशांत चव्हाण, श्रीकांत घोगरे, यज्ञेश पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

“तालसंग्राम २०१८ ” या ढोलताशा स्पर्धेत १४ ढोलताशा पथके सहभागी होणार आहेत. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण आदी ठिकाणाहून ढोलताशा पथके येणार आहेत. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या ह.भ.प. सावळाराम महाराज संकुल या भव्य मैदानावर या स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेसाठी क्रीडा भारती, एस्सेल वर्ल्ड, भारतीय सैनिक विद्यालय खडवली, डोंबिवलीकर एक सांस्कृतिक परिवार आणि कल्याण डोंबिवली महानगर पालिका यांचे योगदान मिळाले आहे. २७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजता स्पर्धेचे उद्घाटन होणार असून महापौर राजेंद्र देवळेकर व अन्य मान्यवर उपस्थित रहाणार आहेत तर २८ जानेवारी रोजी होणाऱ्या समारोप कार्यक्रमात राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार जगन्नाथ शिंदे, मनसे नेते राजू पाटील उपस्थित राहणर आहेत. स्पर्धेचे प्रथम पारितोषिक १ लाख ५० हजार रुपये, द्वितीय पारितोषिक १ लाख रुपये तर तृतीय पारितोषिक ५० हजार रुपये असे आहे. तसेच उत्कृष्ठ ढोल, ताशा, ध्वजाधारी यांसाठी प्रत्येकी १० हजार रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे. यावेळी १६ ढोलपथकांच “महावादन” करण्याचा संस्थेचा मानस आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email