डोंबिवलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी रिपाईचे उपोषण

डोंबिवली पूर्वेकडील इंदिरा चौकाजवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याबाबत ठराव सर्वसाधारण सभेत आठ वर्षापूर्वी मंजूर झाला होता. मात्र पालिका प्रशासन ठरावाची अंमलबजावणी करत नसल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने मंगळवारी इंदिरा चौकात एक दिवसीय उपोषण करण्यात आले. कॉंग्रेसचे पदाधिकारी संतोष केणे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा दिला. महापौर राजेंद्र देवळेकर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन १४ एप्रिल पर्यत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email