डोंबिवलीत ठिय्या आंदोलन

(श्रीराम कांदु)

डोंबिवली दि.०९ – सकल मराठा समाज डोंबिवली शहराच्या वतीने ९ ऑगस्ट क्रांती दिनी पूर्वेकडील इंदिरा चौकात ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. आरक्षणासाठी मराठा समाजातील हुतात्मा झालेल्यांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी आंदोलनात सहभागी झालेल्या वर्षा गुजर यांनी सरकारचे मराठा समाजाकडे लक्ष नसल्याचे सांगत मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे असे सांगितले. तर सारिका चव्हाण म्हणाल्या, आम्ही आंदोलन लोकशाही मार्गाने करत आहोत. आमच्या आंदोलनाचा कोणाला त्रास होणार नसून आम्ही दुकाने, शाळा , महाविद्यालये, रिक्षा, परीवहन सेवा सुरूच राहण्यास सांगितले.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email