डोंबिवलीत ट्युशन टीचरची निर्घृण हत्या
(श्रीराम कांदु)
डोंबिवली – डोंबिवलीतील कोपरगावात असलेल्या एका इमारतीतील फ्लॅटमध्ये मनीषा खानोलकर या 65 वर्षीय महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. विष्णूनगर पोलिस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा नोंद करत तपास सुरू केला. पोलिसांनी रोहित तायडे या तरुणाला अटक केली आहे. आपल्या आईला शिवीगाळ केल्याने संतापलेल्या रोहितने खानोलकर यांच्या घरात घुसून त्यांच्या डोक्यात चाकू आणि कुकर ने मारत तिची हत्या केल्याचे तपासात उघड झाले आहे .
डोंबिवली कोपर गाव येथील ओम परशुराम अपार्टमेंटमध्ये मनीषा खानोलकर 17 ते 18 वर्षांपासून एकट्याच राहत होत्या. त्या मुलांची शिकवणी घ्यायच्या. रविवारी सायंकाळी 4 च्या सुमारास शिकवणीसाठी आलेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचा दरवाजा ठोठावला मात्र त्यांनी दरवाजा उघडला नाही. त्यामुळे मुलांनी खिडकीतून डोकवून पहिले तेव्हा त्या स्वयंपाकघरात निचपत पडलेल्या दिसल्या. मुलांनी त्वरित सोसायटीच्या निदर्शनास आणून दिले. दरवाजा तोडला असताना मनीषा यांचा मृतदेह स्वयंपाकघरात रक्ताच्या थारोळ्याच्या खोलीत मृत अवस्थेत आढळून आला. तसेच या मृतदेहाच्या शेजारी रक्ताने माखलेला चाकू आणि कुकर सापडला होता. घटेनची माहिती मिळताच पोलिसांनी हा मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पालिकेच्या रुख्मिणीबाई रुग्णालतात पाठविला आहे.
दरम्यान, पोलिसांनी तपासात रोहित तायडे या तरुणाला अटक केली आहे. त्याने आपल्या आईसोबत मनीषा यांचे काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्यांनी आपल्या आईला शिव्या दिल्याचा राग त्याच्या मनात होता. या रागातून त्याने खानोलकर यांचे घर गाठत घरात घुसून खानोलकर यांच्या डोक्यात कुकर घालत त्यांची हत्या केल्याचे पोलिसांना सांगितले.