डोंबिवलीत जुन्या वादातून तरुणाला बेदम मारहाण

कल्याण- डोंबिवली पूर्वेकडील पाथरली रोड महेश म्हात्रे चाळीत राहणारा राजा शिवराम दारा 19 या तरुणाचे याच परिसरात राहणाऱ्या आरिफ ,ऋषीकेश,गुरुनाथ म्हात्रे, विकास म्हात्रे ,या चौघासोबत भांडण झाले होते . या भांडणाच्या रागातुन या चौघांनी राजाला याच परिसरातील समर्थ विहार टॉवर जवळ गाठले व आपल्या चार ते पाच साथीदारांच्या मदतीने राजा ला लोखंडी रॉड व ठोशाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत तेथून पळ काढला .या हल्ल्यात राजा जखमी झाला असून त्याने या प्रकरणी टिळक नगर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसांनि आरिफ ,ऋषीकेश,गुरुनाथ म्हात्रे, विकास म्हात्रे ,या चौघासह त्यांच्या चार ते पाच साथीदार विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केलं आहे .
Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email