डोंबिवलीत घरफोड्या घरासह कंपनीतही चोरट्यांचा डल्ला

कल्याण : कल्याण डोंबिवली मध्ये चोरट्यांच्या कारवाया दिवसागणिक वाढत चालल्या असून या गुन्ह्यांना रोखण्यात पोलीस यंत्रणेला अपयश आल्याचे दिसून येत आहे रात्रीच्या सुमारास घर फोडी करणाऱ्या या चोरट्या ची मजल दिवसाढवळ्या चोरी करण्यापर्यंत गेली असून नागरिक दहशतीच्या वातावरणात आहेत. त्यातच काल डोंबिवली मध्ये मानपाडा व टिळकनगर पोलीस स्थानकाच्या हद्दीत मिळून दोन घरफोड्या ची नोंद झाली आहे. डोंबिवली पुर्वेकडील पांडुरंगवाडी मधील सुखधाम बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या ६५ वर्षीय महिला ११ जून रोजी काही दिवसांकरीता कामानिमित्त राहत्या घराला कुलूप लावून बाहेरगावी गेल्या होत्या. घराला कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यानी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील सोन्या चांदीच्या दागिन्यांसह एकूण ९७ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. काल रात्री घरी परतल्या नंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी या प्रकरणी टिळकनगर पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली असून या तक्रारी नुसार पोलिसानी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. तर दूसरी घटना डोंबिवली एम आय डी सी परिसरातील जी मेटल कटिंग सोल्युशन या कंपनीत घडली आहे. अज्ञात चोरट्यानी काल रात्रीच्या सुमारास कंपनीच्या वॉल कंपाउंड वरील लोखंडी पट्ट्या वाकवून कंपनीमधील ३० हजार रुपये किमतीचा बॅटऱ्या चोरून नेल्या. या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email