डोंबिवलीत घरफोडी
कल्याण – डोंबिवली पूर्वेकडील आयरे गाव परिसरात नेहा दर्शन चाळीत राहणारे विकास गावकर हे मंगळवारी काही कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेले होते .काल पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने घराला कुलूप असल्याची संधी साधत घराचा बंद दरवाजा उचकटून घरात प्रवेश करत टीव्ही ,रोख रक्कम ,एक दुचाकी असा मिळून एकूण १८ हजारांचा मुद्देमाल लंपास केला .काल सकाळी घरात परतल्या नंतर त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आल्याने या प्रकरणी गावकर यांनी डोंबिवली पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे .
Please follow and like us: