डोंबिवलीत घरफोडी
डोंबिवली – डोंबिवली पूर्वेतील सारस्वत कॉलनीतील कुसुमानंद इमारतीत राहणाऱ्या गोपालकृष्ण पांडुरंग गोरे (66) हे आपले घर बंद कुटुंबासह पुणे येथे गेले होते .तीच संधी साधून चोरट्याने घराचे लॉक तोडून 20 हजार रुपयांची रोकड आणि 17 हजारांचे दागिने असा मुद्देमाल घरफोडी करून चोरून नेला .याप्रकरणी डोंबिवली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.