डोंबिवलीत घरफोडी
डोंबिवली – पूर्वेकडील गोग्रासवाडी परिसारत मेघदूत सोसायटी मध्ये राहणारे पुष्पराज स्वामी हे काल सकाळी कामानिमित्त राहत्या घराला कुलूप लावून बाहेर गेले होते .हि संधी साधत अज्ञात चोरट्यांनी दुपारच्या सुमारास त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करत रोकड ,सोन्याचे दागिने असा मिळून एकूण ५४ हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला .दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घरात परतल्या नंतर त्यांना घरात चोरी झाल्याचे निदर्शानास आले त्यांनी या प्रकरणी टिळक नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे .
Please follow and like us: