डोंबिवलीत घरफोडी ७८ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास

डोंबिवली दि.२८ – डोंबिवली पूर्वेकडील आनंद नगर येथील पंचरत्न सोसायटी मध्ये राहणारे सुर्यकांत रणशूर हे काल दुपारी आपल्या राहत्या घराला कुलूप लावून कामानिमित्त बाहेर गेले होते. घराला कुलूप असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील रोकड व सोन्याचे दागिने असा मिळून एकूण ७८ हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. तासाभराने रणशूर पुन्हा घरी परतले असता त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले त्यांनी या प्रकरणी टिळक नगर पोलीस स्थानकात तक्रार दखल केली असून या तक्रारी नुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

Please follow and like us:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error

Enjoy this blog? Please spread the word :)

Follow by Email