डोंबिवलीत क्षुल्लक कारणावरुन हत्या
डोंबिवली दि.११ – रिक्षाचालक आणि दुचाकीस्वार यांच्यात झालेल्या क्षुल्लक वादातुन विजय लष्कर (४०) या तरुणाची हत्या झाल्याची घटना बुधवारी दुपारी डोंबिवली पूर्वेतील टंडन रोड येथे घडली. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी दुचाकिस्वार नितिन केणे (२७,रा.खोणीगाव) याला ताब्यात घेतले आहे.
काल दुपारी १:३० च्या सुमारास मयत विजय हा त्याचा रिक्षाचालक भाऊ अजय लष्कर याच्या सोबत रिक्षातुन टंडन रोडने घरी जेवन करण्यास जात होता. त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगातुन आलेल्या दुचाकीस्वार नितिन केणे याने त्यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली. याचा जाब रिक्षाचालक अजयसह त्याचा भाऊ विजय याने जाब विचारला. यातून त्यांच्यात बचाबाची झाली. अखेर चिडलेल्या दुचाकीस्वार नितिन केणे याने त्यांना मारहाण करण्यास सुरूवात केली.
या मारहाणीत विजय यांच्या छातीत जोरदार फटका बसल्याने तो खाली पडला. अखेर त्याला जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी विजयला मृत घोषित केले. या प्रकरणी अजय लष्कर याच्या फिर्यदिवरुन नितिन केणे विरोधात रामनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून त्यास ताब्यात घेतले असल्याचे रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयसिंग पावर यांनी सांगितले.