डोंबिवलीत करणी सेने आणि राजपूत सेनेचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
(श्रीराम कांदु)
पद्मावती सिनेमा डोंबिवलीतील सिनेमागृहात प्रदर्शित होण्यास विरोध करणाऱ्या करणी सेना आणि राजपूत सेनेच्या कार्यकर्त्यांना बुधवारी सायंकाळी डोंबिवली रामनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. मधुबन सिनेमागृहाबाहेर थिएटर काही अनुचित प्रकार घडू नये कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पद्मावती सिनेमा प्रदर्शित करण्यास विरोध करण्यासाठी करणी सेना आणि राजपूत सेनेचे कार्यकर्ते मधुबन सिनेमागृहाच्या परिसरात जमा झाले होते. मात्र कोणतही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सर्व कार्यकर्त्यांना डोंबिवली रामनगर पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर यांनी सांगितले. त्यामुळे कार्यकर्त्यांना सिनेमागृहाबाहेर निदर्शने करता आले नाही.सिनेमागृहाबाहेर पोलीस बंदोबस्त पाहून नक्की कशासाठी पोलीस उभे आहेत हे नागरिकांना सनजत नव्हते. त्यामुळे पद्मावती सिनेमा पाहण्यासाठी सिनेमागृहात नागरिक गर्दी करतील का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.